मन माझे चपळ न राही निश्चल घडी एकी पळ स्थिर नाही ||
संत तुकाराम महाराजांची ही रचना, .. त्याचप्रमाणे मी...
स्वतःची कला जोपासण्यासाठी आणि आर्थिक सुबत्तेसाठी संघर्ष करतोय, या दोन्ही गोष्टिंचा ताळमेळ घालताना मनाची चंचलता खुपच त्रासदायक वाटते. त्याचवेळी मन भरकटत असताना नवा आनंद शोधण्यासाठी केलेले उपक्रम, अचानकपणे समोर येवून मन प्रफुल्लित करणारया गोष्टि व त्यातून मिळालेला आनंद, वेगळे अनुभव, व्यथा, वास्तव मांडणे आणि महत्वाचं म्हणजे आपल्याकडे असलेल्या शब्दसंग्रहाच्या साठयामध्ये अजून भर पडावी या हेतूने हा ब्लॉग लिहिण्याचा खटाटोप...
आपले सल्ले, अपेक्षा, नवीन विषय माझ्यापर्यंत जरूर पोहोचवावेत, मला शक्य असल्यास त्यावर माझ्या कुवतीप्रमाणे लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन.
मी एक विद्यार्थी आहे, प्रत्येक गोष्टीतून नेहमीच शिकण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे लिखाणात असंख्य चुका आढळल्यास माफी असावी. आपल्या प्रामाणिक प्रतिक्रियांच स्वागत असेल, मग त्या चांगल्या असो वा वाईट. त्यामुळे भेट देत रहा.... धन्यवाद !
0 Comments