" लिहायचे किडे "
निसर्गाची ओढ असल्याने अलिकडे चितमपल्ली वाचावेसे वाटतात, त्यांचेच "रानवाटा" हे पुस्तक हातात होतं, प्रास्ताविकाच्या पुढे गेल्यानंतर अनपेक्षितपणे एक कथा भेटायला आली ती म्हणजे त्या पुस्तकातील पहिलीच कथा "अरणी". सदर पुस्तकामध्ये नागपूर विद्यापिठाच्या पदवी परीक्षेच्या अभ्यासक्रमातील मराठीच्या पुस्तकात अरणी या कथेचा समावेश करण्यात आला होता असं वाचलं. पण माझं शिक्षण मुंबई विद्यापीठा अंतर्गत झालेलं असल्याने अरणी मला, नेमकी कधी भेटलेली ते काही आठवत नाही.
पालघाटच्या दक्षिणेकडील फाटा, अनेमले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या (अनेमले या तामिळ शब्दाचा अर्थ हत्ती) या पर्वतावर सागवानाची लागवड करण्यास प्रयत्नशील असलेले इंग्रज हत्ती, सांबर, मुंगूस, साळू यासारख्या वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे त्रासलेले असताना सागवान लागवडीचे हे आव्हान पेलण्यासाठी वुडस नावाच्या अधिकाऱ्याची निवड होते. जंगलातील एका पडीक बंगल्याची डागडुजी करून त्यामध्ये वुडस राहू लागतो.
जंगलामध्ये लहान लहान वस्त्यामध्ये राहणाऱ्या, फळे, कंदमुळे तसेच शिकार करून आपली गुजराण करत निसर्गाआधारित शाश्वत, स्वच्छंदी जिवन जगणाऱ्या या आदिवासींना पैशाची गरज नसल्याने वुडसला सागवान लागवडीसाठी मजूर मिळणे कठीण होते. पण वुडसच्या सेवाभावी वृत्तिमुळे ऋणी झालेल्या आदिवासींकरवी, मोसमी वारे वाहू लागताच शंभर, दीडशे एकर तोडलेल्या जमिनीत सागवानाची लागवड केली जाते. रोपांबरोबर वाढणारे तण वेगानं आणि रोपे मात्र हळूहळू वाढतात, हे सांगताना चितमपल्ली इथे एक महत्वाचा संदेश देतात. "सत्प्रवृत्तीचं रोप हळूहळू आणि दुष्ट प्रवृत्तीचं तण नेहमीच माजतं".
सागवानाच्या या लागवडीत पुरुषभर उंच वाढलेल्या गवताकडे आकर्षित झालेल्या हत्तींकडुन नष्ट झालेली रोपे पाहून "माणसाचं आयुष्य लहान आहे, पण ज्याच्यासाठी त्याला जगावसं वाटतं अशा झाडांना त्याहुनही कमी आयुष्य आहे, त्यामुळे आयुष्याची गोडी कमी होते." वुडसला झालेली जाणीवही फार महत्वाची वाटते.
जंगलात वावरणारे माकडांचे कळप, त्यांच्या वनक्रिडा, त्यांचा मिश्किलपणा. वाघिण आणि तिची पिल्ले, त्यांच्यातील संबंध, अस्वले, पक्षी, त्यांचे आवाज, पखमांजराचा 'कुक S कुक' आवाज, वाघाची डरकाळी, घाबरलेल्या सांबराचा 'पोंक' असा आवाज, झाडाच्या पानांवरून ठिबकणाऱ्या दवबिंदूंचा आवाज, मोर, याच वुडसच्या विरंगुळ्याच्या गोष्टी. सकाळच्या कोवळ्या उन्हात सोनेरी केसांचं दिसणारं मुंगूस आणि नाग यांच्या लढाईत तर त्याला सर्पगंधेचा शोध लागला.
वुडसची आणि अरणीची भेट होण्याचे निमित्त म्हणजे भेकरीचं तांबूस रंगाचं जखमी पाडस. त्यांच्या भेटीचे पुढे विवाहात झालेल्या रूपांतरामुळे वुडसच्या जीवनात अरणी आल्यानंतरचं त्याचं जीवन खूपच रंजक वाटतं. हत्तीचा पर्वत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पर्वतावर वुडसला हत्तीचे मृत अवशेष कुठेच सापडले नव्हते. अरणीला हत्तींच्या नैसर्गिक मृत्यूबद्दल असलेले पिढीजात ज्ञान, वन्य पशुपक्ष्यांविषयी असलेले उपजत ज्ञान, आदिवासींची भाषा, या सगळ्याचाच वुडस भागीदार होता. अरणीमुळेच हत्ती उंटाला घाबरतात हे वुडसला ज्ञात झालं. उंटांना पाहून लागवडीत हत्ती फिरकणे बंद झाल्याने लागवडीला यश मिळाले. वुडस आणि अरणीच्या मेहनतीने रोपांचे वृक्षात रूपांतर झाले. त्या वृक्षांकडे पाहताना वुडसला ते दोघेही त्या पर्वतावर उभे असलेले वृक्षच आहेत असे वाटे. हाथी डोहात उडी मारल्यास गजराजाच्या आत्म्याला क्लेश होतात या श्रद्धेने उडी न मारता पोहणाऱ्या अरणीला दिलेली सुसरीची उपमा, हस्तिदंताला दिलेली शुभ्र कमळाची उपमा, हाथीपागडीचं रहस्य, हरकुशेठ ला हस्तिदंत विकणाऱ्या तिच्या बापाचं चातुर्य या सगळ्याचे वर्णनही विशेष वाटतं.

शालेय जीवनात अरणी वाचलेलं असल्याने या कथेतील हाथीडोह, हस्तिदंत, उंटावर बसून केलेली लागवडीची राखण, नाग-मुंगूसाची लढाई या घटना पुसटश्या लक्षात होत्या, अरणी पुन्हा वाचनात आल्याने त्या अधोरेखित झाल्या.
अरणीबद्दल कल्पना करून पाहिली तर एक विशिष्ट आकृती नजरेसमोर ठाकते. वुडस ने हरणाचं पाडस छातीशी धरून असलेलं तिचं काढलेलं रेखाटन तसंच असेल का? तिच्याबद्दल उत्सूकता निर्माण होते. जंगलात आपल्या भावाबरोबर राहणारी, जंगलातल्या पशुपक्ष्यांच्या पाऊलखुणांची लिपी शिकलेली, त्यांची गूढ रहस्ये ज्ञात असलेली, वुडसचं जीवन समृद्ध करणारी एक असामान्य चिरतरुण मुलगी, नजरेतल्या चित्रात दिसणारी ही अरणी त्या गजराजाच्या मागून का गेली असेल? वुडसच्या जीवनात अचानक आलेली ही अरणी अचानकपणे त्याला एकाकी ठेवून का निघून गेली असेल? हा प्रश्न डोक्यात घेराव घालत राहतो.
2 Comments
Keep it up.. Nice story... Ashyach interesting article lihit raha
ReplyDeleteThank You..
Delete